सेक्स विद्यापीठाला टाळं

विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) चक्क सेक्सचं विद्यापीठ सुरू झालं होतं. सोशल मीडियात सेक्स तंत्राची जाहिरात चांगलीच व्हायरल झाली होती.

विद्येचं माहेरघर अशी पुण्याची जगात ओळख आहे. पुणेकर ही ओळख अभिमानानं मिरवतात. पण त्याच पुण्यात आता सेक्सचं विद्यापीठ सुरु झालंय. पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स तंत्राची जाहिरात करण्यात आली होती. सेक्स तंत्र या नावानं पुण्यात एक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं, त्याचीच ही जाहिरात होती.  ही बातमी दाखवली आणि लावून धरली त्यानंतर पोलिस आणि प्रशासन खडबडून जागं झालं. आता हे शिबीर रद्द करण्यात आलंय. या जाहिरातीत नेमकं काय होतं ते पाहुयात. जाहिरातीतील एका क्यू आर कोडद्वारे संपर्क साधता येतो. प्रत्येक व्यक्तीला 3 दिवसांसाठी 15 हजार रुपये आकारण्यात येणार होते.

सेक्स विद्यापीठात कुठले कोर्सेस?  

वैदिक सेक्स तंत्र
डिव्हाईन फेमिनाईन
मस्क्युलाईन एम्बोडीमेंट
चक्र अॅक्टिव्हेशन
ओशो मेडिटेशन

बातमी दाखवताच सुजाण पुणेकरांनी या जाहिरातीला कडाडून विरोध केला.दुसरीकडे पुणे सायबर पोलिसांनी या जाहिरातीची चौकशी सुरु केलीय. जाहिरातीत देण्यात आलेल्या नंबरवरुनच आयोजकांपर्यंत पोहचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *