दाढी करायला आलेल्या युवकाचा सलून चालकाने गळा चिरला, नातेवाईकांनी सलून चालकाला ठेचला

दाढी करायला आलेल्या युवकाचा सलून चालकाने गळा चिरला तर युवकाच्या नातेवाईकांनी सलून चालकाची ठेचून हत्या केली. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बोधडीमध्ये घडली. किनवट तालुक्यातील बोधडी हे मोठं गाव आहे. बोधडीमध्ये अनिल शिंदे याचं सलून आहे. या सलूनमध्ये संध्याकाळी गावातील 22 वर्षीय तरुण  व्यंकट देवकर हा दाढी करण्यासाठी आला होता.

दाढी करत असताना दाढीच्या पैश्यावरून सलून चालक अनिल आणि व्यंकट यांच्यात वाद झाला. संतापाच्या भरात सलून चालक अनिल शिंदे याने दाढी करण्याच्या वस्तऱ्याने व्यंकटचा गळा चिरला. गळा चिरल्याने अधिक रक्तस्त्राव होऊन व्यंकट तडफडून मृत्यू झाला. व्यंकटची हत्या झाल्याचं समजताच त्याचे नातेवाईक संतप्त झाले.

हत्या केल्यानंतर अनिल शिंदे फरार झाला आणि गावात एका झुडुपात लपून बसला होता. पण व्यकंटच्या नातेवाईकांनी त्याला शोधून काढलं. तिथून त्याला बाजारपेठेत आणून सलून चालक अनिल शिंदे याची ठेचून त्याची हत्या केली. इतकंच नाही तर आरोपींनी अनिल शिंदे यांचे सलून आणि घराला देखील आग लावली.  हत्या आणि जाळपोळ केल्यानंतर आरोपी पसार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *