नऊ वर्षाच्या मुलीवर तिघांचा बलात्कार ; पोलिसांकडून आरोपी अटकेत

आजोबांच्या वयाच्या तीन इसमांनी एका नऊ वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार झाल्याची घटना भांडूप येथे समोर आली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. पीडित मुलगी तिच्या नातेवाईक महिलेसह भांडूप परिसरातील एका झोपडपट्टी परिसरात राहत असून त्यांच्याच शेजारी तीन वृद्ध इसम राहतात. आजोबांच्या वयाच्या या इसमांनी दोन वर्षात अनेकदा या मुलीवर बलात्कार केला. एका सामाजिक संस्थेच्या सदस्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या मुलीला बालसुधारगृहात दाखल केले होते.

याठिकाणी काम करणाऱ्या एका महिलेने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. याबाबत महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोन आरोपीना अटक केली. अन्य एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *