आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा! उपचार घेणाऱ्या रुग्णांसोबत ठेवला मृतदेह

वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात एका रुग्णाचा मृतदेह तब्बल 12 तास इतर रुग्णांसोबत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसई गावातील डि एम पेटिट रुग्णालयात हा प्रकार घडला असून या प्रकारावरून इतर रुग्णांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

उपचार सुरू असलेल्या या रुग्णाचा रात्रीच मृत्यू झाला होता. मात्र रात्रीपासून सकाळपर्यंत हा मृतदेह एकाच रूममधील इतर रुग्णांसोबत ठेवण्यात आला होता, त्यावरील डास व माश्यांचा त्रास इतर रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना होत होता.

रुग्णालयात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेले धीरज वर्तक या दक्ष नागरिकाने हा संतापवाना प्रकार पहिला आणि तो आपल्या मोबाईल कमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या प्रकाराबाबत रुग्णालयात प्रसाशनाशी संपर्क साधण्याचा आला मात्र तो होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *