माण तालुक्यातील संभूखेड गावचे जवान सचिन विश्वनाथ काटे (वय २४ ) यांना देशसेवा बजावत असताना राजस्थान येथे वीरमरण आले. या घटनेमुळे माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. संभूखेड येथील जवान सचिन विश्वनाथ काटे यांना देशसेवा बजावत असताना राजस्थानमध्ये बुधवारी (दि.२० ऑक्टोबर) रोजी रात्री वीर मरण आल्याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली.
पाच वर्षापुर्वी सचिन काटे भारतीय सेनेत भर्ती झाले होते. त्यांचा लहान भाऊ देखील रेवन विश्वनाथ काटे हा लहान भाऊ आसाम येथे देशसेवा बजावत आहे. आई-वडिल हे गावी शेती करतात. सचिन काटे यांना वीर मरण आल्याची माहिती मिळताच माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई वडील आणि लष्कर सेवेत असलेले भाऊ असा परिवार आहे.
