पती-पत्नीच्या नात्यासोबत घरांवरही पडली ठिणगी; शेजारची 10 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी

पती – पत्नीमधला वाक किती विकोपाला जाईल याचा काही नेम नाही. नवरा – बायकोच्या भांडणात कधीच शहाण्या माणसाने पडू नये म्हणतात, ते काही खोटं नाही. साताऱ्यात नवरा-बायकोच्या भांडणात चक्क 10 घरं जळून खाक झाली. सुमारे 59 लाखांहून अधिक नुकसान झालंय.

पत्नीशी भांडताना स्वतःचे घर जाळताना आजूबाजूच्या दहा घरे जळून खाक झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव घडली आहे. या घटनेत सुमारे पन्नास लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे.पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडण सुरू होती.

भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेंव्हा घरातील सिलेंडरने ही पेट घेतला. नंतर या आगीने रुद्र रूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला. आणि ही सर्व घरे जळून खाक झाली. या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रूपयाचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली. संबंधित पतीला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जाळणाऱ्या पतीला मात्र ग्रामस्थांनी आगीतून बाहेर काढत चांगला चोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *