कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाने दाखलवेल्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेचा जीव वाचला

कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाने दाखलवेल्या सतर्कतेमुळे एका गर्भवती महिलेचा जीव वाचला आहे. जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणारी महिला ट्रेनखाली जाणार इतक्यात जवानाने धाव घेत महिलेचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकावरील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सोमवारी कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे एक्स्प्रेस फलाटावर थांबली होती. यावेळी आरपीएफ कॉन्स्टेबल एस आर खांडेकर तिथेच उभे होते. एक्स्प्रेस सुरु झाल्यानंतर महिला चुकीच्या पद्धतीने उतरत असल्याचं लक्षात येता खांडेकर यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान महिला तोल जाऊन खाली पडली असता खांडेकर यांनी तिला तात्काळ बाजूला खेचत ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं.

ही महिला गर्भवती होती. खांडेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेसह तिच्या बाळालाही जीवनदान मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *