सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवत क्रुझवर पोहोचली नूपुर सारिका

ड्रग्स प्रकरणी मुलगा आर्यन खानचं नावसमोर आल्यानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आर्यन खानला एनसीबीने एका रेव्ह पार्टीतून अटक केली आहे. यावेळी त्याच्यासोबत इतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामधील नूपुर सारिकाने क्रुझमध्ये ड्रग्स सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवत आणले होते. क्रुझ ड्रग्स प्रकरण दिवसागणिक वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहे नूपुर सारिका?
नूपुर सारिका दिल्लीत लहान मुलांची शिक्षिका म्हणून काम करते. नूपुरला मोहकने ड्रग्स दिल्याची माहिती आहे. हे ड्रग्स सॅनेटरी पॅड्समध्ये लपवून नूपुर रेव्ह पार्टीत आली होती. एनसीबीने  नूपुरकडून ड्रग्स जप्त केले.

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण बाहेर आलं आहे. बॉलिवूड मधील ड्रग्स प्रकरण बाहेर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड एकत्र आलं होतं. आता देखील प्रसिद्ध अभिनेत्री नफीसा अली सोढी, सुनिल शेट्टी, सुझैन खान आणि अन्य सेलिब्रिटींनी आर्यनची पाठराखन केली आहे.

यावेळी आर्यनसोबत इतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मुलाला अटक झाल्यानंतर देखील अद्याप शाहरूखने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण बाहेर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *