रेल्वेच्या धडकेत एक वर्षाच्या मुलासह वडील ठार

पुणे-मिरज मार्गावरील लोणंद (ता खंडाळा) रेल्वे स्टेशन जवळ रविवारी रात्री बंगळूर-जोधपूर एक्सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरीतील एसआरपीमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (२८ वर्ष) आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा रुद्र बोडके याचा दुर्देवी मृत्यू झाला.

शैलेश ज्ञानेश्वर बोडके हे धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत आहे. तर त्यांची पत्नी मुंबई पोलीस दलामध्ये आहे. शैलेश बोडके हे सुट्टी घेऊन दोन दिवसापुर्वी अंदोरी (ता खंडाळा) रुद्र बोडके या मुलासह येथे घरी आले होते. रविवारी एक वर्षाच्या मुलासह सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेला असता बंगळूर-जोधपूर एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेमध्ये दोघेही ठार झाले.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक व्ही आर पाटोळे, पी एन भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते. आंदोरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेत बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने अंदोरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *