वसईच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला ३० फूट लांबीचा व्हेल मासा!

वसईच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला ३० फूट लांबीचा व्हेल मासा!

वसईच्या सुरुची बाग किनाऱ्याजवळ असलेल्या बेनापट्टी किनाऱ्यावर ३० फूट लांबीचा आणि १२ फूट रुंद असा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना वसई पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभाग आणि वसई विरार महानगरपालिकेला याबाबत माहिती दिली.व्हेल मासा मृत अवस्थेत आढळल्यानंतर तीनही प्रशासनातर्फे या माशाचा पंचनामा करण्यात आला असून त्याच्या शरीरावर जखम असल्याचे दिसून आलं आहे. तसंच बुधवारी या माशाला महापालिकेच्या साहाय्याने किनाऱ्यावरच पुरण्यात येणार असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक कल्याण करपे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *