जम्मू-काश्मीरमधील चकमकीत अल-बद्रचे तीन दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत अल-बद्रचे तीन दहशतवादी ठार झाले, तर अन्य एक दहशतवादी शरण आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शोपियनमधील कनिगाम येथे दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला आणि रात्री शोधमोहीम हाती घेतली. त्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तौसिफ अहमद हा दहशतवादी शरण आला, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

त्यानंतर तौसिफ यानेही आपल्या अन्य साथीदारांना शरण येण्यास सांगितले, मात्र त्यांनी त्याला नकार देऊन सुरक्षा दलांवर बेछूट गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्याला प्रत्युत्तर दिले असता तीन दहशतवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे दानिश मिर, मोहम्मद उमर भट आणि झैद रेशी अशी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *