नियंत्रण सुटलेले चीनच्या रॉकेटमुळे आपत्तीचे संकट

 जगाला कोरोनाव्हायरस साथीच्या (Coronavirus) आजारात टाकणार्‍या चीनने (China) अंतराळ राजा होण्याच्या क्रेझमध्ये आणखी एका संकटाला जन्म दिला आहे. चीनने सोडलेला रॉकेट (Rocket) अंतराळात चीनचे रॉकेट  ऑऊट ऑफ कंट्रोल झाले आहे आणि वेगाने पृथ्वीकडे  (Earth) येत आहे. 21 टन वजनाचे हे रॉकेट एखाद्या वस्ती असलेल्या परिसरात पडल्यास मोठी आपत्ती येऊ शकते, अशी शास्त्रज्ञांना भीती आहे. तथापि, अमेरिका  (America)  नियंत्रण नसलेल्या रॉकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

8 मे रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल?

सीएनएनच्या अहवालात म्हटले आहे की, पेंटॅगॉन (Pentagon)चीनच्या अनियंत्रित रॉकेटचा शोध घेत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ता माइक हॉवर्ड म्हणाले की, चीनच्या लाँग मार्च (Chinese Long March 5B Rocket) 5 बी रॉकेट 8 मेच्या सुमारास पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. ते म्हणाले की अमेरिकेची स्पेस कमांड रॉकेटचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून हा धोका काही प्रमाणात टाळता येईल.

अचूक अंदाज करणे कठिण

हॉवर्ड म्हणाले की रॉकेट पृथ्वीवर नेमके कोठे जाईल हे सांगणे कठीण आहे, पण स्पेस कमांड त्याचा मागोवा घेत आहे. चीनने 29 एप्रिललाच लाँग मार्च 5 बी रॉकेट प्रक्षेपित केले होते, परंतु ते अवकाशात गेल्यानंतर नियंत्रण सुटले. (Chinese Long March 5B Rocket) हे रॉकेट कोठेही कोसळण्याची भीती वैज्ञानिकांना आहे. हे रॉकेट मॉड्यूल घेऊन अंतराळ स्थानकात गेले. मॉड्यूल निश्चित कक्षामध्ये सोडल्यानंतर ते पृथ्वीवर परत येणार होते, परंतु आता चीनचे यावरील आपले नियंत्रण गमावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *