एक हजार ज्येष्ठांचा करोनाने मृत्यू

करोनामुळे ठाणे शहरात आतापर्यंत १ हजार ६०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी यामध्ये सर्वाधिक ६० वर्षे आणि त्यापुढे वय असलेल्या एक हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. या वयोगटातील करोनाबाधितांचे एकूण प्रमाण १६.८ टक्के असून आतापर्यंत १७ हजार ३९५ ज्येष्ठांनी करोनावर मात केली आहे. सध्या एक हजार ६०७ रुग्ण उपचार घेत आहेत. ठाणे शहरातील करोनाबाधितांच्या संख्येने एक लाख १९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये अन्य वयोगटापेक्षा ३१ ते ४० वयोगटातील बाधितांची संख्या सर्वाधिक दिसून येते. या वयोगटातील बाधितांचे प्रमाण २२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ४१ ते ५० वयोगटातील बाधितांचे प्रमाण १८.८ टक्के आहे. ठाणे शहरामध्ये दगावलेल्या रुग्णांपैकी ६० वर्षे आणि त्यापुढील नागरिकांचे सर्वाधिक बळी गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *