मानवतेला लाज आणली, कोरोना बाधित आईला घरात डांबून मुलाचे पलायन

कोरोनाव्हायरस (Coronavirus)साथीच्या आजारात माणुसकीचे वेगवेगळे रुपे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लोक आपल्या प्रियजनांना या आजारापासून वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत, तर अन्य ठिकाणी स्वत: चा बचाव करण्यासाठी  आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून देत असल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. स्वत:च्या मुलाने आईलाच  घरात कोंडून सोडून पळ काढला.

आईला खोलीत केले बंद

आग्रा येथे कोरोना विषाणूसंबंधित अशी घटना उघडकीस आली आहे. ज्याने मानवतेला लाज आणली आहे. मुलाला जन्म देणारी आई. कोरोनाच्या संकटामध्ये हाच मुलगा आणि सूनेने आपल्या आईला घरात कोंडून पलायन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना कमला नगर कोठी क्रमांक 192 मधील आहे. मुलाने आपल्या आईला खोलीत बंद करुन कुलूप लावून पळून गेला. त्याला भीती होती की, वृद्ध झाल्यामुळे आई कोरोनाबाधित (Coronavirus)असेल या भीतीपोटी त्याने आपल्या आईलाच घरात कोंडले.

नातवांनी आजीला बाहेर काढले

वृद्ध महिलेला तिच्या खोलीत बंद करण्यात आल्याची माहिती तिच्या नातवंडांना मिळाली. नातवंडानी आजीला वाचविण्यासाठी घराबाहेर पडली. नातवंडानी  112 ला फोन करून पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नातवंड यांच्या सहाय्याने दाराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला,  मात्र, कुलूप उघड नव्हते. त्यानंतर पोलिसांनी दुसरा दरवाजा तोडून त्या महिलेला बाहेर काढले. त्यामुळे या वृद्ध महिलेचा जीव वाचवला. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *