विरारच्या रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 13 जणांचा होरपळून मृत्यू

विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयात काल मध्यरात्रीच्या सुमारास ICU वॉर्ड मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत १० ते १२ जणांचा आगीमुळे होरपळून  मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..

या घटनेची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

त्याच सोबत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात  हलविण्यात आले आहे.मात्र या संपूर्ण घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याचे प्राथमिक तपासातून कळतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *