सातारा – कराडच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई; तातडीने पुरवठा न झाल्यास गंभीर परिस्थिती

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. सातारा-कराडच्या खाजगी कोविड रुग्णालयांत काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळतेय.

सातारा जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी होऊनदेखील पुरवठा होत नाहीये. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रुग्णालयांनी ऑक्सिजन अभावी हतबलता व्यक्त केली आहे. दक्ष कराडकर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोर्टेबल ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था केली आहे. तरीही ऑक्सिजनचा पुरवठा लवकरच झाला नाही. तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *