वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर मुंबई महानगर पालिकेने कठोर पावलं उचलली आहेत. रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर 24 तासाच्या आत कोरोना चाचणीचे रिपोर्ट देण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. खासगी बेड अडवून ठेवतात त्यामुळे उर्वरित दिवस हॉटेलमध्ये राहण्याची सोय आहे. ऐपतीप्रमाणे हॉटेल निवडावे असेही त्या म्हणाल्या.
325 बेड अतिरिक्त केले आहेत पण बेड हवे असलेल्या रुग्णांची संख्या 2466 वर संख्या गेली आहे. 7 दिवसांच्या आत 1100 अतिरिक्त कोविड सेंटर कार्यरत होतील असेही त्या म्हणाल्या. तसेच उत्सवात बाहेर पडू नका असे आवाहन देखील त्यांनी केले.
ग्निशमन दिनानिमित्ताने मॉक ड्रिल होणार नाही तसेच अग्निशमन सप्ताह देखील साजरा होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने इमारतीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. इमारती सील केल्या जात आहेत. वेळ पडल्यास रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी सांगितले जात असल्याचे त्या म्हणाल्या.
खासगी रुग्णालयात लसीकरणास सुरुवात झाली आहे. आता २६६४ आयसीयु बेड आहेत. आयसीयु बेड ३२५ अतिरिक्त जोडले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली.
