मैत्री नाकारल्यावरून पतीला मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

तीन वर्षांपासून मैत्रीसाठी पाठलाग करणाऱ्या ‘रोडरोमिओ’ला महिलेने नकार दिल्यानंतर, त्याने तिच्या पतीला मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पिसोळी गावात घडला. एका ३५ वर्षीय महिलेने या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून उंड्री रोड (पिसोळी गाव) येथे राहणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी दोघेही एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादी कामानिमित्त घराबाहेर पडल्या, की आरोपी गेल्या तीन वर्षांपासून त्यांचा पाठलाग करत आहे. तो वारंवार फिर्यादीला मैत्री करण्याबाबत सांगत असे. फिर्यादीने प्रत्येक वेळी आरोपीस नकार दिला. फिर्यादी या १९ मार्च रोजी एनआयबीएम रस्त्यावर असतानाही आरोपीने त्यांना गाठले. त्या वेळी फिर्यादीने आरोपीला नकार दिला असता, आरोपीने त्यांच्या पतीस मारण्याची धमकी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *