शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेला सोन्याचा हार (Gold Necklace) दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यात आला होता. हा हार आता सीआयडीने जप्त केला आहे. समृद्ध जीवनचे महेश मोतेवार याने दगडुशेठ हलवाई गणपतीला सव्वा किलो सोन्याचा हार अर्पण केला होता. या हाराची किंमत तब्बल 58 ते 60 लाखांच्या घरात आहे. दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून संबंधीत सोन्याचा हार CIDकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला महेश मोतेवार हा सध्या जेलमध्ये आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये शेळीपालन तसेच शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली होती. आर्थिक आमिष दाखवून मोतेवार याने अनेक शेतकऱ्यांची गंडा घातला होता. या फसवणुकीप्रकरणी अनेक ठिकांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. याच प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा सोन्याचा हार सीआयडीने जप्त केला.
महेश मोतेवार याची चौकशी सीआयडीकडून सुरु आहे. याचदरम्यान, सोन्याचा हार दिल्याचे छायाचित्रातून समोर आले. त्यानंत अधिक चौकशीनंतर हा हार दगडूशेठ गणपतीला अर्पण केल्याचे समजले. सीआयडीने श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टशी संपर्क साधला. त्यानंतर हा हार स्ट्रने सीआयडीकडे दिला. महेश मोतेवारने केलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. त्याने गुंतवणूकदारांना फसवून कुठेकुठे पैशांची गुंतवणूक केली, याचा शोध घेणं सध्या सुरु आहे.
दरम्यान, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला अर्पण केेलेला एक सोन्याचा हार जप्त करण्यात आला आहे. मोतेवार याने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला अर्पण केलेला सोन्याचा हार शेतकरी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून हा हार खरेदी केला होता, असेही अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
