नवी दिल्ली ते लखनऊ असा प्रवास करणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसला आज पहाटे आगीनं घेरलं. यामुळे रेल्वेतील प्रवासी चांगलेच धास्तावले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही.
सकाळी ६.४५ वाजल्याच्या सुमारास ही रेल्वे गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. तेव्हा या गाडीच्या पार्सल कोचमध्ये आग लागली.कोचला आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर लागलीच रेल्वेचे ज्येष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी थोड्याच वेळात या आगीवर नियंत्रण मिळवलं. रेल्वेच्या इतर डब्यांना मात्र या आगीमुळे कोणतीही हानी झालेली नाही.
