अमरावती, अचलपुरात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती शहर आणि अचलपूर शहरात सात दिवसांच्या (7 Days Lockdown on Achalpur and Amravati)  कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अचलपुरात नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. अचलपूर बसस्थानकात मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असतेय पण अचलपूर शहरात सध्या लॉकडाऊन असल्याने बसस्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळात आहे.

लातूरमध्ये जनता कर्फ्यू 

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात जनता कर्फ्यु करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं होतं. या जनता कर्फ्यु मध्ये प्रशासनातर्फे कसल्याही प्रकारची सक्ती केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं होतं. या जनता कर्फ्यूचा आज पहिला दिवस आहे.. HOLD FOR WKT  लातूर शहर आणि जिल्ह्यात कशा पद्धतीने जनता कर्फ्यु सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *