प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ; १०० जिलेटीनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर जप्त

केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.

रमानी असं ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव असून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. ही महिला मूळची तामिळनाडूची आहे. चौकशी केली असता विहिर खोदण्यासाठी आपण ही स्फोटकं नेत होतं असा दावा तिने केला आहे. रेल्वे पोलीस सध्या याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *