नोकरीचे प्रलोभन देत महिलेला घेऊन गेले; धावत्या कारमध्ये केला बलात्कार

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नोकरीचे प्रलोभन देऊन कारमध्ये बसवून घेऊन गेले आणि बलात्कार केला, असा आरोप महिलेने एका व्यक्तीवर केला आहे. या गुन्ह्यात त्याला मदत केल्याचा आरोप तिने कार चालकावरही केला. पोलिसांनी आरोपी रामबाबू गुर्जर आणि त्याच्या कारचालकाला अटक केली आहे.

पीडित महिला कुलैथ येथे राहते. धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याचा आरोप तिने मुरैना येथील रामबाबू याच्यावर केला आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने तो घेऊन गेला. बहोडापूर येथे त्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर धावत्या कारमध्ये त्याने बलात्कार केला, असा आरोप तिने केला आहे. चालकाने या गुन्ह्यात त्याला साथ दिली. त्याने कार थांबवली नसल्याचेही तिने सांगितले.

पीडित महिलेने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर तिने इंदरगंज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तिने सर्व हकिकत सांगितली. पोलिसांनी तिच्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल केला. आरोपी रामबाबू आणि त्याच्या कारचालकाला अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विजय भदौरिया यांनी सांगितले की, इंदरगंज पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर महिलेने तक्रारीत उल्लेख केलेल्या दोघांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *