टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी आत्महत्या

 टिकटॉक स्टार समीर गायकवाड  याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.  रविवारी सायंकाळी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रेमप्रकरणातून त्याने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समीरच्या मित्राने नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलिसांना याबाबत सांगण्यात आलं. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड राहातो.  रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये समीर गायकवाड शिकत होता. म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवणारा समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याची रेडलाईट डायरीज ही ब्लॉगवरील मालिका चांगलीच गाजली होती. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता.

मात्र समीरने उचललेल्या पाऊलामुळे त्याच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *