सातारा-पंढरपूर एसटी बसवर दरोड्याच्या उद्देशाने दगडफेक

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपुर रस्त्यावरील म्हसवड जवळच्या पिलीव घाटात चार ते पाच अज्ञात दरोडखोरांनी एसटी व मोटरसायकल चालकावरही दगडफेक केल्याची घटना घटना घडली आहे. यामध्य़े मोटारसायकलचा चालक व बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माळशिरस व म्हसवड पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

दारोड्याच्या उद्देशाने झुडपात लपून बसलेल्या दरोडेखोरांनी गाड्यांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी एसटी बसवर व मोटारसायकलवर दगडफेक केली. यामध्ये मोटारसायकलीवरुन चाललेल्यांना आणि बसच्या ड्रायव्हरला  प्रवाशांना दगड लागला असून यामध्ये ते जखमी झाले आहेत. मात्र अद्याप कोणतीही चोरीची घटना झाली नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *