पत्नीकडून पतीचा विजयोत्सव साजरा

पुणे जिल्ह्यतील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव झाला. जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवलं. या घवघवीत यशा मागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळं, विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीनं आपल्या पतीच्या विजयासाठी त्यांना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढत आनंद साजरा केला.

पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतांनी विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव केला. ज्यानंतर त्यांच्या पत्नी, रेणुका यांनी थेट आपल्या पतीलाच खांद्यांवर उचलून घेत गावातून फेरी मारली. गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा कल्ला होणारी विजयी मिरवणूक आजवर सर्वांनीच पाहिली असेल. पण, खुद्द पत्नीनं असा विजयोत्सव साजरा केल्याचं हे दृश्य अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मित आणून गेलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *