ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं नावाजलेलं नाव. आजवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि चतुरस्त्र दिग्दर्शनातून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर सतीश कौशिक आता मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत. ‘मन उधाण वारा’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, मोनल गज्जर, रित्विज वैद्य, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
