जिल्हा परिषद शाळेत१३३ शिक्षक रुजू होणार

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नजीकच्या काळात १३३ शिक्षक रुजू होणार आहेत. पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे निवड झालेल्या संबंधित शिक्षक उमेदवारांच्या कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे. एक उपशिक्षणाधिकारी व चार विस्तार अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. सोमवारी आणि मंगळवारी मिळून ११६ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली. निवड यादीतील १७ उमेदवार अनुपस्थित राहिले आहेत. दरम्यान, महापुराच्या आपत्तीमुळे २६ ऑगस्टपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करण्याची मुदत वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *