चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती इंग्लंडकडून भारताला परत

भारतातून अनेक वर्षांपूर्वी चोरीला गेलेली आणि दोन हजार वर्षे प्राचीन असलेली एक तर सतराव्या शतकातील एक अशा दोन कृष्ण मूर्ती इंग्लंडने भारताला परत केल्या आहे. एक मूर्ती चुनखड्यापासून तर दुसरी मूर्ती नवनीत कृष्ण ही आहे. नवनीत कृष्ण ही मूर्ती कांस्य धातूची आहे तसेच ती सतराव्या शतकातली आहे असेही समजते आहे. तर चुनखड्यापासून तयार करण्यात आलेली मूर्ती ही दोन हजार वर्षे प्राचीन आहे असेही सांगण्यात आले आहे.  भारताच्या उच्चायुक्त रुची घनश्याम यांच्याकडे या मूर्ती सुपूर्द करण्यात आल्या. १५ ऑगस्टच्या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी या दोन्ही मूर्ती परत करण्यात आल्या. अमेरिका आणि ब्रिटनच्या एका सर्च टीमने या दोन्ही मूर्तींचा शोध लावला.

१५ ऑगस्टच्या दिवशी लंडन येथे असलेल्या गांधी हॉल ऑफ इंडिया हाऊसमध्ये झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर या दोन्ही मूर्ती सुपूर्द करण्यात आल्या. या मूर्तींचं मूल्य ठरवता येणार नाहीत कारण त्या अमूल्य आहेत. या कलाकृती भारतात परत येणं हे अमेरिका आणि ब्रिटन यांचं भारतासोबत असलेल्या मैत्री प्रतीक आहे असं मत घनश्याम यांनी व्यक्त केलं. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

प्राचीन वस्तूंची तस्करी करणाऱ्या सुभाष कपूर यांनीच या मूर्ती चोरल्या असाव्यात असा आरोप होता. मात्र लंडनमध्ये ज्या एका व्यक्तीकडे ही शिल्प आढळली. या व्यक्तीचं नाव प्रशासनाने बाहेर येऊ दिलेलं नाही. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधून या दोन मूर्ती चोरीला गेल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *