गणपतीपुळे येथे समुद्रात तीन जण बुडाले

 गणपतीपुळे येथे समुद्रात तिघे बुडाले. यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. बुडालेले तिघेही कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. सुरक्षारक्षकांकडून आणखी एकाचा शोध सुरु आहे.

कोकणात पर्यटनासाठी ते आले होते. गणपतीपुळे येथे मंदिरात दर्शन घेऊन समुद्र पाहण्यासाठी किनाऱ्यावर गेलेत. यावेळी ते पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेलेत. ही घटना आज आज पहाटे गणपतीपुळे येथील समुद्रात घडली. तिघांपैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक पुरुष बेपत्ता आहे.

कोल्हापूरमधील कसबा बावडा येथील ते आहेत. काजल जयसिंग मचले (१८), सुमन विशाल मचले (२३) आणि  बागडे (२७) अशी त्यांची नावे आहेत.  यात काजल आणि सुमन यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बागडे हा बेपत्ता आहे. त्यांच्यासोबत आणखी काही तरुण तरुणीही होत्या. त्यांना वाचविण्यात यश आले आहे. चार जणांना सुरक्षा रक्षकांनी समुद्रातून सुरक्षित बाहेर काढले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *