अकरा महिन्याच्या बालकाचा बादलीत पडून मृत्यू

खेळता खेळात पाणी असलेल्या बादलीत पडून ११ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात रविवारी (दि. ११) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. कुटुंबीय झोपलेले असताना हा प्रकार घडला.

तन्मय दीपक भोये (११ महिने, दळवी चाळ, मोरेमळा, हनुमानवाडी, पंचवटी) असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले होते. तन्मय खेळता-खेळता घरात पाण्याने भरून ठेवलेल्या बादलीजवळ गेला. खेळताना त्याचा तोल जाऊन बादलीत खाली डोके व वर पाय या अवस्थेत पडला. नाका तोंडात पाणी जाऊन त्याचा श्वास कोंडला गेला. ही बाब निदर्शनास येताच भोये कुटुंबीयांनी त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तन्मयला मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *