पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने ‘बॅचलर ऑफ व्होकेशनल पत्रकारिता व जनसंज्ञापन’ हा पदवी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यास नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. या अभ्यासक्रमाला प्रवेश सुरू असून, कोणत्याही विद्याशाखेची बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *