शाळेची संरक्षक भिंत ओलांडतांना पाय घसरून विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेची संरक्षक भिंत ओलांडतांना पाय घसरून लोखंडी गजाळीवर पडल्यामुळे एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा गावात ही घटना घडली. जगदीश गजभारे असे या मुलाचे नाव आहे.

मधल्या सुटीत शाळेच्या मागे असलेल्या भिंतीवरून उडी मारून तो बाहेर जात होता. भिंत उतरत असताना त्याचा पाय घसरला. लोखंडी गजाळी पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. शिक्षकांनी त्याला आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *