आजोबांची पैशांची बॅग घेऊन पळणाऱ्या चोराला महिला पोलिसाने पाठलाग करुन पकडलं

महिला पोलिसाने शिताफीने एका चोरट्य़ाला पकडत एका ६० वर्षांच्या आजोबांची मदत केली. कल्याण पोलिसांच्या वाहतूक शाखेत शोभा जाधव या कार्यरत आहेत. शोभा जाधव यांनी प्रसंगावधान राखत आणि धैर्याने एका चोराचा धावत पाठलाग करत एका आजोबांची आयुष्यभराची पुंजी वाचवली.

आपल्या सेवानिवृत्तीचे ३ लाख रूपये बँकेतून काढून निघालेल्या रामजी गुप्ता यांची बॅग एका चोराने खेचली. रामजी गुप्ता या चोरांच्या मागावर धावू लागले. हे दृष्य सहजानंद चौकात ड्युटीवर असलेल्या शोभा जाधवांनी पाहिलं आणि चोरट्याचा पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या.

या चोराला पकडलं असलं तरी त्याच्या टोळीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *