प्रियकराच्या निधनानंतर संजूबाबाच्या लेकीची भावनिक पोस्ट

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. त्रिशाला दत्तच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचं अचानक निधन झालं आहे. त्रिशालाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. बॉयफ्रेंडच्या अचानक झालेल्या निधनावर तिने एक पोस्ट केली आहे. त्रिशालाच्या या पोस्टवर सर्वांनीच दुख: व्यक्त केलं आहे.

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त, इटालियन बॉयफ्रेंडसोबत रिलेशपमध्ये होती. मंगळवारी २ जुलै रोजी तिच्या बॉयफ्रेंडचं निधन झालं. अचानक झालेल्या या घटनेने त्रिशाला अतिशय दु:खी झाली असून तिने याबाबत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘मला अतिशय दुख: झालं आहे. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, माझी काळजी घेतल्याबद्दल आभारी आहे. तु मला आयुष्यात इतकं आनंदी ठेवलं आहे की याआधी मी कधीही इतकी आनंदी नव्हती. मी जगातील सर्वात नशीबवान मुलगी आहे की, तु मला भेटलास. तु माझ्या हृदयात नेहमी कायम राहशील.’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *