पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांना अटक

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीत आलेल्या तीन दरोडेखोराना आळेफाटा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शंकर जाधव ,गजानन नरवडे, ज्ञानेश्वर चौधरी अशी या तिघांची नावं आहेत. हे सर्व नाशिकच्या गंगापूरभागातील रहिवासी आहेत.

त्यांच्याकडून पोलिसांनी हुडांई असेट गाडी, एक कटावणी, एक चाकू, दोरी, मिरचीपुड, कोयता हे साहित्य जप्त केले आहे.  मात्र या कारवाई दरम्यान याच टोळी सोबत असणारे आणखी दोन आरोपी फरार झाले. या दोन आरोपीचा आळेफाटा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *