अंबाबाईच्या चरणी कोटीचे दागिने

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या वर्षभरात एक कोटी नऊ लाख ७५ हजार किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जमा झाले. वर्षभरात भाविकांकडून देणगीदाखल आलेल्या दागिन्यांची मूल्यांकन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. आजच्या सोनेदराप्रमाणे दागिन्यांची किंमत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केली. गेल्यावर्षीपेक्षा सोन्याच्या दागिन्यांमध्ये ८०० ग्रॅमने वाढ झाली असून चांदीच्या अलंकारांमध्ये २४ किलोंनी घट झाली आहे. जाधव म्हणाले,’देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या अंबाबाई देवस्थान आणि श्री जोतिबा देवस्थानाला दरवर्षी लाखो भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करतात. त्यात अनमोल पाचू, खडे, हिरे माणिकांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांचे मूल्यांकन १७ ते २० जून दरम्यान गरुड मंडप येथे पूर्ण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *