इंडोनेशियात काडेपेटय़ांच्या कारखान्याला आग; ३० ठार

इंडोनेशियामध्ये शुक्रवारी काडय़ापेटय़ांच्या एका कारखान्याला लागलेल्या आगीत अनेक मुलांसह ३० जण ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकले नाही, मात्र ती आटोक्यात आणण्यात आली असल्याचे उत्तर सुमात्रा आपत्कालीन संस्थेचे प्रमुख रिआदिल लुबीस यांनी सांगितले. मृतांमध्ये किमान तीन मुलांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

घटनास्थळाची छायाचित्रे घेण्यात आली त्यामध्ये काळेठिक्कर झालेले मृतदेह एकमेकांवर पडलेले दिसत आहेत. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी घराबाहेर पडत असतानाच मोठा स्फोट झाला, असे स्थानिक रहिवासी बुदी झुल्कीफली यांनी सांगितले. या ठिकाणी मुलांना कामासाठी आणण्यात आले होते असे वाटते, असे लांगकत आपत्कालीन यंत्रणेचे इरवान स्याहरी यांनी सांगितले. या आगीत जळालेल्या मृतदेहांची ओळख  पटविणे कठीण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *