राजारामपुरीतून ५२ लाखांची लूट, आरोपी फरार

हवालाची ५२ लाखांची रक्कम तिघांनी लुटून नेल्याची घटना राजारामपुरीपरिसरात घडली आहे. ही रक्कम एका हवाला कंपनीची असल्यााची माहिती मिळत असून रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतून हवाला ची रक्कम घेऊन संबंधित कंपनीचे दोन कर्मचारी कोल्हापुरात आले होते.

राजारामपुरी परिसरात ते थांबले असता तिघा लुटारूंनी त्यांच्या मोटारीवर हल्ला केला. दगडफेक करून या मोटारीतील दोघांना दम दिला. त्यानंतर ही मोटर त्या दोघा कर्मचाऱ्यांना घेऊन ते शाहूवाडीतून आंब्याच्या दिशेने गेले यातील एकाला शाहूवाडीत तर दुसऱ्याला आंबा परिसरात सोडून दिले आणि ५२ लाखांची रक्कम ते तिघे लुटारू घेऊन पसार झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *