फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी आलेल्या तेरावर्षांच्या मुलासोबत बेडरुममध्ये हुक्का ओढून परदेशी तरुणाने त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा मिरवाईज हा तरुण फिर्यादीच्या सोसायटीत राहण्यास आहे. त्याची फिर्यादीच्या १३ वर्षाच्या मुलाशी मागील ४ महिन्यापासून त्यांची चांगली मैत्री आहे. २ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांचा मुलगा त्याच्या फ्लॅटवर खेळण्यासाठी गेला. त्यावेळी दोघांनी त्याच्या बेडरुममध्ये बसून हुक्का ओढला. त्यानंतर त्याने पीडित मुलाचे कपडे काढून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार पीडित मुलाने घरी येऊन सांगितल्यानंतर पीडिताच्या कुटुंबियांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत़
