युवतीने केला ‘प्रेसयी’वर अॅसिड हल्ला

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीवर तिच्या १९ वर्षीय प्रेमिकेने अॅसिड फेकल्याची घटना घडली आहे. हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली. अॅसिडमुळे भाजलेल्या मुलीवर आग्र्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

ही १७ वर्षीय पीडिता मुलगी आपल्या घराच्या छतावर एकटी झोपली होती, तेव्हा तिच्यावर तिच्या प्रेयसीने हल्ला केला. हल्लेखोर प्रेयसी तिच्या घरमालकाची मुलगी आहे. दोघींमध्ये प्रेमसंबंध होते, पण पीडितेने ते नातं संपवल्याने आरोपी मुलगी नाराज होती.

जेव्हा घटना घडली तेव्हा मात्र पीडितेच्या वडिलांनी तिच्यासोबत शिकत असलेल्या तिच्या मित्रावर संशय घेतला. पोलिसांनी त्या मित्राला अटकही केली होती. मात्र नंतर पोलीस तपासात निष्पन्न झालं की पीडितेवर तिच्या प्रेमिकेनेच हल्ला केला. पीडितेच्या मित्राला या गुन्ह्यात गोवण्यासाठी आरोपीने स्वत:च्या हातावर देखील अॅसिड सांडवलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *