‘डेडलाईन संपत आल्यामुळे सीबीआयने माझ्या नवऱ्याला अडकवलं’

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या पत्नीने आपला पती निर्दोष असल्याचा दावा केला. या हत्याप्रकरणात माझ्या नवऱ्याचा कोणताही सहभाग नाही. एटीएसने सोडल्यानंतर सीबीआयने चौकशी करतो म्हणून त्याला नेले आणि फसवले.

गुन्हेगार शोधण्यासाठी सीबीआयला २० ऑगस्टपर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, त्यांना मारेकरी शोधता आला नाही. त्यामुळेच आता सीबीआयने माझ्या पतीला या सगळ्यात अडकवले आहे, असे शीतल अंदुरे यांनी सांगितले.

अंदुरेच्या वकिलांनी कोर्टात सर्व आरोप फेटाळून लावले. केवळ वेळ मारुन नेण्यासाठी आणि राजकीय दबावापोटी सचिन अंदुरेला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *