ब्रेकअप केले म्हणून प्रियकराने चोरलं शौचालय

तुम्ही अनेक प्रकारची ब्रेकअप ऐकली असतील. ब्रेकअप झाल्यानंतर राग व्यक्त करण्यासाठी अनेक वेगवेळ्या गोष्टी करतात. कोणी आपल्या एक्सच्या जवळच्या व्यक्तीला डेट करतो. तर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपला राग व्यक्त करत असतात. अनेकजण आपल्या प्रेयसीने दिलेल्या भेटवस्तू फोडून राग व्यक्त करतात. पण सोशल मीडियावर एक वेगळ्याच प्रकारचे ब्रेकअपची स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे. ती ऐकून तुम्हीही विचारात पडाल की कोणी असे करू शकते? ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने शौचालय चौरल्याचा आरोप एका मुलीने केला आहे. आणि सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय आहे.

सोशल न्यूज एग्रीगेटर रेडिटला दिलेल्या माहितीमध्ये त्या मुलीने प्रियकराने शौचालय चौरल्याचा आरोप केला आहे. ती म्हणते, ‘रागाच्या भरात तो माझ्या घरातील शौचालय घेऊन गेला. ज्यावेळी त्याच्यासोबतचे सर्व नाते तोडले. त्यावेळी तो सामान घेण्यासाठी घरी आला होता. तो सामान घेताना मला झोप आली तेव्हाच त्याने माझे शौचलय चोरले.’

‘मागील का दिवसांपूर्वी शौचालय खराब झाले होते. घरमालकाला याबद्दल काही माहिती दिली नव्हती. प्लबिंगचे काम येत असल्यामुळे प्रियकराने ते दुरूस्त केले होते. ज्यावेळी आमचा वाद होत असे त्यावेळी तो सतत मला म्हणत असे की, या घरांमध्ये मी खूप पैसा खर्च केला आहे. तरीही तू माझ्याशी अशी वागते आहेस.’ अशी माहिती प्रेयसीने दिली आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून दोघे सोबत राहत होते. पण गेल्या दोन महिन्यापासून त्यांच्यात सतत भांडणे सुरू होती. मुलीने पुढे सांगितले की, महिनाभरापासून मी ब्रेकअप करण्याच्या तयारीमध्ये होते, पण योग्या वेळच मिळत नव्हती. ज्यावेळी गेल्या आठवड्यात मी ब्रेकअप बद्दल त्याच्याशी बोलले. त्याचा त्याला राग आला. अन् त्याने सामान घेऊन जाताना त्याने माझे शौचलय चोरल्याचा आरोप मुलीने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *