आरोग्य मंत्र्यांची रुग्णालयाला अचानक भेट, कर्मचाऱ्यांची पळापळ

राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. आरोग्य मंत्र्यांनी अचानक भेट दिल्याने कार्मच्याऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी रुग्णालयातील प्रसूती गृह आणि नवजात शिशु अतिदक्षता विभागालाही त्यांनी भेट दिली. गेल्या वर्षी याच कक्षातील नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. या कक्षाची पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

दुसरीकडे, औरंगाबाद येथील नवीन जिल्हा रुग्णालयाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक सावंत यांनी केली. यावेळी येणाऱ्या महिनाभरात नवीन शासकीय रुग्णालय सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याआधीच रुग्णालयाची ओपीडी सुरू झाली असून आजवर 15000 रुग्णांनी याचा फायदा घेतला असल्याचे ते म्हणाले. तसेच आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी वाळूज मधील उद्योजकांचीही भेट घेतली. यावेळी 3 महिन्यात वाळूज येथील औद्योगिक क्षेत्रात नवीन पोलीस स्टेशनसाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *