राहाता येथील बरखा संजय सोमवंशी सी.ए.उत्तीर्ण. बरखा ही भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय भागवत सोमवंशी यांची कंन्या असून ती वयाच्या २२ व्या वर्षी सी.ए.परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली. राहाता शहरात मुलींमध्ये सी.ए.होणारी ती पहिलीच विद्यार्थिनी आहे.
ओबीसी समाजात तालुक्यात पहिली सी.ए. होण्याचा बहुमान बरखा हिने पटकावला आहे. १० वीनंतर नाशिक येथील के.टी.एच.एम.महाविद्यलयात वाणिज्य शाखेत तिने प्रवेश घेतला. ११ वी १२ वीचे शिक्षण चालू असतानाच सी.पी.टी.चा अभ्यास सुरू केला. १२ वी नंतर तीन महिन्यांनी सी.पी.टी.ची परीक्षा पास होऊन आय.पी.सी.सी.परीक्षेचा पुढील अभ्यास सुरू केला.
एफ.वाय. कॉमर्सचे शिक्षण घेत असताना आय.पी.सी.सी.चे दोन्ही ग्रुप पास होऊन नाशिक येथील बी.जी.काळे यांच्याकडे आर्टिकलशिप सुरू केली. यानंतर सी.ए.फायनल परीक्षेचा अभ्यास करत असताना एम.कॉम.विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाली. मे २०१८ मध्ये झालेल्या सी.ए.परीक्षेचा निकाल २० जुलै रोजी जाहीर झाला त्यात बरखा सोमवंशी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाली.
सोमवंशी हीस या कामी डॉ. विनायक गोविलकर, बी.जी.काळे, विश्वनाथ पगार, लिलाबाई पगार, वडील संजय सोमवंशी व आई मनीषा सोमवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.