मुलुंडमध्ये कारमध्ये आढळला प्रेमी युगुलाचा मृतदेह

मुलुंड न्यायालयाच्या परिसरात पहाटे एका कारमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सकाळी काही नागरिकांनी या परिसरात एक गाडी खूप वेळ हेडलाईट चालू ठेऊन उभी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची पाहणी केली. पोलिसांना आतमध्ये या दोघांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी कारच्या काचा फोडून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या कारमध्ये विषाची एक बाटली ही सापडली आहे. यावरून या दोघांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

सलमान खान असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे तो मुलुंड विभागात राहणारा असून मनीषा नेगी ही 21 वर्षीय तरुणी ठाण्यात रहाते. या दोघांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेम सबंध होते, मात्र त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. चार दिवस आधीच या दोघांनी घर सोडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *