बीग बींसोबत या बोल्ड सीननंतर रात्रभर रडली होती ही मराठी अभिनेत्री

बॉलिवूड सिनेमा आणि कलाकारांच्या संदर्भात असे अनेक किस्से असतात जे आपल्याला माहित नसतात. आज एका आम्ही तुम्हाला एक असाच किस्सा सांगणार आहोत जो कदाचित तुम्हाला माहित नसेल. आज बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्साही असतात पण एक अशी अभिनेत्री आहे जिने अमिताभ यांच्यासोबत एक बोल्ड गाणं केलं होतं त्यानंतर ती खूप रडली होती.

1982 सालची ही गोष्ट आहे. नमक हलाल सिनेमामधलं हे गाणं होतं. या सिनेमाचे निर्माता होते प्रकाश मेहरा. या सिनेमामध्ये अमिताभ आणि स्मिता पाटील मुख्य भूमिकेत होते. स्मिता पाटील या सिनेमांमध्ये साधा रोल करणं पसंत करतात. या सिनेमामध्ये ही त्या फक्त साडीमध्येच दिसल्या होत्या. या सिनेमामध्ये एक बोल्ड गाणं देखील होतं. जे खूप प्रसिद्ध झालं. आज रपट जाए तो हमें ना बचैय्यो” हे गाणं शूट करत असतांना स्मिता पाटील खूप घाबरल्या होत्या. हे गाणं पावसात शूट करायचं होतं. स्मिता पाटील या बोल्ड सिनेमे किंवा गाणे कधी करत नाहीत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांना खूप समजावल्या नंतर त्यांनी हे गाणं शूट केलं. हे खूप रोमँटीक गाणं होतं. शूटींग संपल्यानंतर त्यांना वाटलं की त्यांच्याकडून काही चूक झाली. त्यांना भीती होती की या गाण्यामुळे त्यांचे फॅन्स त्यांच्यावर नाराज होतील. यामुळे त्या रात्रभर झोपल्या नाहीत आणि रडत राहिल्या. दूसऱ्या दिवशी जेव्हा स्मिता पाटील पुन्हा शूटींगसाठी आल्या तेव्हा त्यांना पाहून अमिताभ यांना कल्पना आली की स्मिता कालच्या शूटींगमुळे अपसेट आहे. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांना समजावलं. त्यांनी यानंतर कोणत्याही कमर्शियल फिल्ममध्ये काम न करण्याची भूमिका अमिताभ यांना बोलून दाखवली. त्यानंतर अमिताभ यांनी या गाण्याचं महत्त्व त्यांना सांगितलं. त्यानंतर त्या पुढच्या शूटींगसाठी तयार झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *