नवी मुंबईत सानपाडा सेक्टर ४ मध्ये एमएसईबीच्या डीपीला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे डिपीला आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये कोणत्याही जिवितहानीचे वृत्त समोर आले नाही.
