पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

पिंपरी-चिंचवड शहरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली यावेळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला.अचानक झालेल्या पावसाने पिंपरी चिंचवडकरांची चांगलीच त्रेधा उडाली. मागील दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते.यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता.परंतु आज आलेल्या जोरदार पावसाने शहरवासीयांना चांगला दिलासा मिळाला आहे.वादळी वाऱ्यासह तब्बल अर्धा तास पाऊस झाला. यावर्षी केरळात दोन दिवस अगोदरच मान्सूनचा धडकला आहे.यामुळे महाराष्ट्रातील काही शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले .पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव,कासारवाडी,आकुर्डी,हिंजवडी,निगडी,भोसरी,या भागात गारांसह पाऊसाने हजेरी लावली.यावर्षी पाऊसाने वेळीच हजेरी लावल्याने शहरवासीय सुखावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *