इंद्राणी मुखर्जी जेजे रूग्णालयात तातडीने दाखल

शिणा बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. छातीत दुखत असल्यानं रात्री उशीरा तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

२४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणीला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने शीनाच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला आहे. तसेच याशिवाय तिघांवर तिचे अपहरण करणे, त्यानंतर तिची हत्या करणे, गुन्ह्याबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे, असे मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच शीनाचा भाऊ मिखाईल याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा कट रचल्याचा आरोपही ठेवण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *